Video: ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले सूनिता आणि बुच
नऊ महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर नासाचे अंतराळवीर सूनिता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलने यशस्वी लँडिंग केले, ज्यामध्ये त्यांच्यासोबत नासाचे निक हॅग आणि रशियाचे अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्बूनोव्हदेखील होते. ही घडामोड अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि नासा-स्पेसएक्सच्या अथक मेहनतीचे प्रतीक आहे.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच अत्यंत गरम होते, त्यामुळे समुद्रात उतरल्यानंतर त्याची तापमान नियंत्रण प्रक्रिया केली जाते. ५ जून २०२४ रोजी १० दिवसांसाठी नियोजित मोहिमेवर गेलेल्या या अंतराळवीरांना यानातील तांत्रिक बिघाडामुळे तब्बल ९ महिने अंतराळात राहावे लागले. शेवटी, दीर्घ प्रतीक्षेनंतर सूनिता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले, आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले.