IPL 2025: विराटसोबत सलामीला कोण? RCB च्या संभाव्य संघावर नजर!

IPL 2025: विराटसोबत सलामीला कोण? RCB च्या संभाव्य संघावर नजर!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या हंगामात मोठ्या बदलांसह मैदानात उतरणार आहे. फाफ डू प्लेसिसला संघात न ठेवता नेतृत्वाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या ओपनिंग जोडीमध्येही बदल झाला आहे. विराट कोहलीसोबत या हंगामात फिल सॉल्ट ओपनिंग करणार आहेत. सॉल्टने गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी खेळले होते.

22 मार्चपासून IPL 2025 सुरू होत असून, उद्घाटन सामन्यातच RCB आणि KKR समोरासमोर असतील. मात्र, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या अनुपस्थितीचा फटका RCB ला बसू शकतो, कारण त्याचा खेळ पहिल्या सामन्यासाठी निश्चित नाही. बॅटिंगमध्ये लियाम लिविंगस्टोन, जीतश शर्मा, टीम डेविड आणि क्रुणाल पंड्या यांसारखे तगडे फलंदाज आहेत. गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमारच्या साथीला लुंगी एनगिडी आणि यश दयाल असतील. फिरकीसाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सुयश शर्माला संधी मिळू शकते, जो मागील हंगामात KKR साठी खेळला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *