आयपीएल पुनरागमनासाठी सज्ज रोबिन मिंज

आयपीएल पुनरागमनासाठी सज्ज रोबिन मिंज

तरुण विकेटकीपर-बॅट्समन रोबिन मिंजच्या कारकिर्दीला एका अपघाताने मोठा फटका बसला होता. स्पोर्ट्स बाइकवर बाहेर पडताना त्याचा अपघात झाला आणि त्यामुळे तो गेल्या हंगामात आयपीएल खेळू शकला नाही. त्याच्या शक्तिशाली फलंदाजीचे प्रदर्शन पाहण्याची क्रिकेटप्रेमींची इच्छा अपुरीच राहिली.

गुजरात टायटन्सने मागील हंगामात त्याला रिटेन केले नाही, पण यावेळी मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवला. आता मुंबईच्या संघात तो आपले स्थान मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. पहिला पसंतीचा विकेटकीपर-बॅट्समन बनण्यासाठी रोबिन जोरदार प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *