भारतात येत आहे स्टारलिंक इंटरनेट, पण किंमत किती परवडणारी?

भारतात येत आहे स्टारलिंक इंटरनेट, पण किंमत किती परवडणारी?

भारतात स्टारलिंक (Starlink) सॅटेलाइट इंटरनेट लवकरच सुरू होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या या सेवेचे प्रथम शहरांमध्ये आणि नंतर ग्रामीण भागात विस्तार होईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेल आधीच स्टारलिंकसोबत भागीदारी करत आहेत.

स्टारलिंक ही एक सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा आहे, ज्यासाठी टॉवर किंवा फायबर केबलची आवश्यकता नसते. ही सेवा दुर्गम भागात वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देऊ शकते. मात्र, याची किंमत तुलनेने खूप जास्त आहे. जिओ आणि एअरटेलच्या ५जी ब्रॉडबँड सेवा ५९९-६९९ रुपयांत मिळतात, तर स्टारलिंकसाठी दरमहा सुमारे १०,५०० रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा असूनही, किंमत सामान्य ग्राहकांसाठी मोठा अडथळा ठरू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *