‘द हंड्रेड’ मध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला स्थान नाही! भारतीय प्रभाव कारणीभूत?
March 13, 2025

इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगच्या खेळाडूंच्या लिलावात तब्बल ५० पाकिस्तानी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी आपली नावे नोंदवली होती. मात्र, एकाही संघाने त्यांना संधी दिली नाही. काही तज्ज्ञांच्या मते, भारतीय उद्योगपतींच्या मालकीच्या संघांमुळे पाकिस्तानी खेळाडूंना डावलले गेले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (१.१४ कोटी रुपये) सर्वात महागडा खेळाडू होता, तरीही कोणत्याही संघाने त्याला घेतले नाही. शादाब खान, इमाद वसीम, हसन अली यांच्यासारखे खेळाडूही अपात्र ठरले. महिला क्रिकेटपटू अलीया रियाझ, फातिमा सना यांनाही कोणताही करार मिळाला नाही.
२००९ पासून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. आता इंग्लंडच्या लीगमध्येही त्यांना स्थान न मिळाल्याने हा भारतीय प्रभावाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या नूर अहमदला संधी मिळाली आहे.