पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले ४ लाख डॉलर्स! दुबईहून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांना पुण्यात अटक

पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले ४ लाख डॉलर्स! दुबईहून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांना पुण्यात अटक

दुबईहून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या बॅगमधून ४ लाख डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे साडेतीन कोटी रुपये) जप्त करण्यात आले. हे डॉलर्स पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून भारतात आणले जात होते. दुबईहून पुणे विमानतळावर पोहोचताच विमानतळावरील गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट) विद्यार्थ्यांच्या बॅगमधून ते डॉलर्स हस्तगत केले.

या तीन विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अगरवाल यांचे नाव समोर आले. प्राथमिक तपासानंतर अधिकाऱ्यांना समजले की त्या बॅग्स खुशबू यांच्याच होत्या. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी चौकशीत सांगितले की, पुण्यातून दुबईला जाताना खुशबू यांनी त्यांच्याकडे दोन बॅग दिल्या होत्या आणि सांगितले होते की त्यात दुबई ऑफिससाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, जी पोहोचवायची आहेत. विद्यार्थ्यांनी दुबई पोहोचल्यानंतर त्या बॅग्स दिलेल्या पत्त्यावर सुपूर्द केल्या. परंतु, परत येताना त्याच बॅग्स घेऊन येताना पुणे विमानतळावर त्यांना अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचा दावा आहे की त्या बॅग्समध्ये काय होते, याची त्यांना कल्पना नव्हती.

शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवालामार्गे (बेकायदेशीर आर्थिक व्यवहार) डॉलर्स दुबईला पाठवले जात असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे शुल्क विभागाने दुबईतील तपास संस्थांना सतर्क करून या तीन विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्याची विनंती केली होती. त्यानंतर हे तीन विद्यार्थी स्पाइसजेटच्या विमानाने दुबईहून परत आले. त्यांच्याकडे दोन बॅग्स होत्या. विमानतळावर उतरल्याबरोबरच त्यांची कसून तपासणी करण्यात आली आणि त्याच वेळी पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले डॉलर्स आढळून आले. शुल्क विभागाने हे सर्व डॉलर्स जप्त केले असून अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *