महिला पोलिसांनी वाचवले गर्भवती महिलेचे प्राण
March 16, 2025

मुंबई महिला पोलिसांनी एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास रे रोड शिवडी येथे मासूमा शेख नावाची महिला एका बंद टॅक्सीत रक्ताने माखलेली आणि प्रसूती वेदनांनी तडफडत होती. याची माहिती साऊथ कंट्रोल रुमला मिळताच निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर परिस्थिती पाहून तातडीने 108 क्रमांकावर कॉल करत रुग्णवाहिका बोलावली. आता बाळ व आई सुरक्षित आहेत.