जाणता का, जगातील पहिला SMS कोणता होता?

जाणता का, जगातील पहिला SMS कोणता होता?

तुम्हाला माहिती आहे का, जगातील पहिला एसएमएस कोणता होता? हा संदेश ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवण्यात आला होता. पहिल्या एसएमएसमध्ये अवघ्या १५ अक्षरांचा मजकूर होता – “मेरी ख्रिसमस”. हा संदेश नील पॅपवर्थ यांनी लिहिला आणि तो व्होडाफोन नेटवर्कद्वारे पाठवण्यात आला. व्होडाफोनचे कर्मचारी रिचर्ड जार्विस हे पहिला एसएमएस मिळवणारे भाग्यवान व्यक्ती होते.

त्या काळात हे एक नवे तंत्रज्ञान होते, ज्यामुळे भविष्यात संवादाची संकल्पना पूर्णपणे बदलून जाईल, हे कुणालाही ठाऊक नव्हते. हळूहळू, टेक्स्ट मेसेजिंग जगभर लोकप्रिय झाले आणि मोबाईल कम्युनिकेशनचा एक महत्त्वाचा भाग बनले. आज जरी मेसेजिंग अॅप्स अधिक वापरले जात असले, तरीही एसएमएस काही महत्त्वाच्या प्रसंगी आवश्यक ठरतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *