विक्रमी विजयासह फायनलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्लीशी अंतिम सामना

विक्रमी विजयासह फायनलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्लीशी अंतिम सामना

महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे. एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार विजय मिळवला. पहिल्या हंगामातील विजेत्या मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरी विसरून या वेळी प्रचंड दमदार पुनरागमन केले आहे. दिल्ली कॅपिटल्स आधीच नेट रनरेटच्या जोरावर थेट फायनलमध्ये पोहोचली होती.

मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात शानदार फलंदाजी करत विक्रमी ४/२१३ धावा केल्या. हेली मॅथ्यूज (५० चेंडूत ७७), नॅट सिव्हर ब्रंट (४१ चेंडूत ७७) आणि हरमनप्रीत कौर (१२ चेंडूत ३६) यांनी तुफान खेळी केली. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्स १६६ धावांमध्ये गारद झाली. हेली मॅथ्यूजने गोलंदाजीतही चमक दाखवत ३ बळी घेतले. आता अंतिम सामन्यात मुंबई आणि दिल्ली भिडणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *