लडाखमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का, काश्मीरही हादरले

लडाखमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का, काश्मीरही हादरले

लडाखमधील कारगिलमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. शुक्रवारी रात्री २.५० वाजता ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा धक्का लडाखसह काश्मीरमध्येही जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत १५ किलोमीटर खोलीवर होता.

या भूकंपामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी झोपेतून उठून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुदैवाने, कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. लेह आणि लडाख हे सिस्मिक झोन-४ मध्ये येतात, त्यामुळे येथे वारंवार भूकंप होत असतात. मागील महिन्यातदेखील या भागात अनेकदा भूकंप जाणवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *