माधुरी दीक्षितवर काँग्रेस नेत्यानं केलं वादग्रस्त वक्तव्य
March 15, 2025

राजस्थानचे काँग्रेस आमदार टिकराम जुली यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी माधुरीला ‘द्वितीय श्रेणी’ अभिनेत्री म्हणत असा दावा केला की तिचा काळ आता संपला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान जुली म्हणाले, ‘माधुरी दीक्षित द्वितीय श्रेणीची अभिनेत्री आहे. “दिल”, “बेटा” या सिनेमांच्या काळात तिचं नाव होतं, पण आता तिची कारकीर्द संपली आहे.’ त्यांच्या या विधानावरून टीकेची लाट उसळली आहे. माधुरीचे चाहते तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.