मंगळावरून परतल्यानंतर सुनिता विल्यम्सना ‘बेबी फीट’ का होणार?

नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर तब्बल दहा महिने अंतराळात राहिल्यानंतर अखेर पृथ्वीवर परत येणार आहेत. त्यांचा मिशन केवळ आठ दिवसांचा होता, परंतु बोईंग स्टारलाईनरच्या तांत्रिक समस्यांमुळे त्यांना अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागले. मात्र, दीर्घ काळ शून्य गुरुत्वाकर्षणात राहिल्यानंतर पृथ्वीवर पुनरागमन करणे सोपे नसते.
अंतराळवीर पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना ‘बेबी फीट’ नावाच्या अवस्थेचा सामना करावा लागतो. वजनशून्य स्थितीमुळे त्यांच्या पायांची टाच आणि तळव्यावरील कठीण त्वचा नरम होते. तसेच, चक्कर येणे, मळमळ होणे यासारख्या लक्षणांचा अनुभव येतो. नासाचे माजी अंतराळवीर लिरॉय चियाओ यांच्या मते, या अवस्थेमुळे पायांची त्वचा नवजात बाळाच्या त्वचेसारखी मऊ होते. अंतराळवीर टेरी व्हर्ट्स यांनी याची तुलना फ्लूशी केली आहे.
विल्यम्स आणि विलमोर यांच्या विलंबामुळे राजकीय चर्चाही रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनी यासाठी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अखेर नासाने १६ मार्च रोजी SpaceX Dragon कॅप्सूलद्वारे त्यांना पृथ्वीवर आणण्याची योजना आखली आहे.