ब्रेकिंग- पुणे पुन्हा हादरले
&w=1200&resize=1200,675&ssl=1)
पुण्यात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे. कारण येथे पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हॉटेलचालक बचावले, मात्र त्यांची दुचाकी जळून खाक झाली आहे. हॉटेलचे मालक अमित खैरे असे त्यांचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉटेलचालकावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पुणे शहरात याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.