फक्त ग्रीन कार्ड पुरेसं नाही! अमेरिकेचं स्पष्ट विधान
March 15, 2025

अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी ग्रीन कार्ड असणे गरजेचे असले तरी, त्यावर अनिश्चित काळ राहता येणार नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रशासनाच्या इच्छेनुसार कोणत्याही क्षणी ग्रीन कार्ड धारकांना परत पाठवले जाऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवीन ‘गोल्ड कार्ड’ योजना आणत आहेत. या योजनेनुसार, परदेशी नागरिक अमेरिकेत गुंतवणूक केल्यास त्यांना तिथे स्थायिक होण्याचा विशेष हक्क मिळेल. त्यामुळे नवीन धोरण गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.