पुतिनचा युद्धविरामास नकार

पुतिनचा युद्धविरामास नकार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सहकारी युरी उशाकोव्ह यांनी अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. रशियाच्या मते, ३० दिवसांचा युद्धविराम म्हणजे फक्त युक्रेनला तात्पुरती विश्रांती मिळण्यासारखे आहे, पण यामुळे युद्धाच्या दिशेत कोणताही मोठा बदल होणार नाही.

दरम्यान, रशियाने कर्स्क भागात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. रशियन सैन्याने दावा केला आहे की त्यांनी कर्स्क प्रदेशातील महत्त्वाचे शहर सुडझा ताब्यात घेतले आहे. अशा पार्श्वभूमीवर पुतिन यांनी अलीकडेच कर्स्कला भेट दिली, ज्यामुळे त्यांच्या लष्करी रणनीतीस अधिक बळकटी मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *