पुणे अत्याचारप्रकरणी आज मंत्रालयात बैठक

पुणे अत्याचारप्रकरणी आज मंत्रालयात बैठक

पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी 12.30 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे राज्यातील बसस्थानकांवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी बसस्थानकांवरील जुन्या बससंदर्भातही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत बसस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करणे, आणि रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू करणे यांसारख्या उपाययोजनांवरही विचार केला जाऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *