दूध दरवाढ: आजपासून नवीन दर लागू
March 15, 2025

पुणे जिल्ह्यात आजपासून (15 मार्च) दूधाच्या नवीन दरांची अंमलबजावणी झाली आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाच्या किमतीत प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गाईचे दूध आता 58 रुपये प्रतिलीटर दराने मिळणार असून, याआधी ते 56 रुपये होते. तसेच, म्हशीच्या दुधाचा दर 72 रुपयांवरून 74 रुपयांपर्यंत वाढला आहे.
ही दरवाढ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटीमध्ये 12 मार्च रोजी झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत ठरवण्यात आली. उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांसाठी ही दरवाढ मोठी असली तरी दूध उत्पादकांना त्याचा काहीसा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.