गोविंदा-सुनीता यांच्या विवाह विच्छेदाबद्दल वकीलाने उघड केली माहिती

गोविंदा-सुनीता यांच्या विवाह विच्छेदाबद्दल वकीलाने उघड केली माहिती

गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने मुंबईत खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुनीता विविध प्रकारे सूचक वक्तव्ये करत होत्या. कधी त्यांनी आपल्या एकटेपणाबद्दल सांगितले, तर कधी मुलाचे कौतुक करत अप्रत्यक्षपणे पतीला दोष दिला. आता ३७ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम देण्याच्या तयारीत हा स्टार दाम्पत्य आहे.

तथापि, त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र मात्र या घटस्फोटाच्या चर्चेला दुजोरा देण्यास तयार नाहीत. आता त्यांचे वकील पुढे आले आहेत. वकिलांच्या म्हणण्यानुसार, हा अर्ज सुनीतानेच सुमारे सहा महिन्यांपूर्वी दाखल केला होता.

दरम्यान, या काळात गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. त्या प्रसंगी जेव्हा त्याला रुग्णालयातून घरी आणले जात होते, तेव्हा सुनीता त्याच्या सोबत सतत उपस्थित होत्या. वकील ललित बिंदाल यांनी सांगितले, ”खरं तर पती-पत्नीमध्ये असे चढ-उतार येत असतात. आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिरातही गेलो होतो. सध्या त्यांच्यात सगळं ठीक आहे. ते दोघं एकत्र होते आणि पुढेही राहतील.”

सुनीताच्या मॅनेजरने देखील घटस्फोटाच्या या चर्चांना पूर्णपणे नकार दिला आहे. गोविंदाने स्वतः सांगितले की, सध्या तो काही व्यावसायिक प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे आणि लवकरच एका चित्रपटाच्या कामात गुंतणार आहे. त्यामुळे त्याला इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *