आरएफएल ॲकॅडमीचे विद्यार्थी CM च्या भेटीला
March 16, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आरएफएल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. या विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांना रोबोटिक्स आणि एआयसंबंधी मार्गदर्शन करणारा ‘रेझिंग फ्युचर इनोव्हेटर्स’ प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाचा डेमो फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.